शीर्षक नाही




पुणे: बारामती येथे दर्जेदार कपडयांची खरेदी वाजवी व होलसेल दरात करता यावी या उद्देशाने राहुल चव्हाण, संतोष बांदल, विवेक भोसले, अनिल कोकरे यांनी मोतीबाग  इंदापूर रोड, बारामती येथे 18 ऑक्टोबर 2018 रोजी पहिल्या सौभाग्य होलसेल साडी आणि रेडीमेड डेपो या वस्त्रदालनाची सुरुवात केली.
ग्राहकांना थेट होलसेल विक्रेत्यांकडून ज्या दरात कपडे येतात त्याच दरात विक्री करुन उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न सौभाग्य होलसेल साडी व रेडिमेड डेपोच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ केला जात आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी त्यांच्याआवडीची कपडे सौभाग्यमध्ये विविध रंगसंगती व व्हरायटीजमध्ये उपलब्ध आहेत. निवडीला मोठा वाव असल्याने सौभाग्य दालन अल्पावधीतच लोकप्रिय बनले आहे. सणासुदीची असो वा लग्नबस्त्याची खरेदी करायची तर फक्त सौभाग्यमध्येच, असेच आता समीकरण बनत चालले आहे. 

बारामतीत ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सौभाग्यची दुसरी शाखा फलटण येथे 25 ऑक्टोबर 2020 रोजी सुरु करण्यात आली व बारामतीप्रमाणेच फलटण तालुक्यातील ग्राहकांनी या दालनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

सौभाग्य होलसेल साडी व रेडिमेड डेपो मध्ये खरेदीचा दुहेरी फायदा होतो. एकीकडे उत्कृष्ट दर्जाचे कपडे खरेदी बरोबरच ग्राहकांना दसरा, दिवाळी व लग्नसराई निमित्त भेटवस्तू सोबतच आकर्षक डिस्काऊंट देखील दिला जात असल्याने कमी बजेटमध्ये अधिक खरेदी शक्य होत आहे. ग्राहकांसह दुकानदार व घरगुती कापड व्यावसायिकांसाठीही येथे होलसेल विक्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आठवड्याचे सातही दिवस दालन सुरु असते शिवाय प्रशस्त पार्किंगमुळे निवांत खरेदीचा आनंद येथे घेता येतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता बारामतीकरांचा सौभाग्यमध्ये खरेदीचा कल वाढला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने