मुकटी येथे आझादी का अमृत महोत्सवनिमित्त गांधी शांती परिक्षा संपन्न




धुळे- लोकहिताय ग्रामीण विकास संस्था,धुळे व सर्वोदय सवांद धुळे यांच्या संयुक्तविद्यामने आझादी का अमृतमहोत्सव निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मूकटी या ठिकाणी गांधी शांती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.यात मूकटी गावातील युवक ,युवती मोठ्या संख्येने परीक्षेस सहभागी झाले.युवा युवतींची वैचारिक बुद्धी प्रगल्भता वाढावी वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने  परीक्षेचे आयोजन करण्यात होते.विद्यार्थ्यांना 8 दिवस पुस्तक वाचनासाठी देऊन त्यावर परीक्षा घेण्यात आली.यावेळी परीक्षेचे संयोजक म्हणून रवींद्र बोरसे सर मूकटी गावातील  श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य श्री.ईश्वर बडगुजर ,लोकहिताय ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते.मूकटी गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिक्षेची व्यवस्था करण्यात आली व ज्ञानेश्वर पाटील ,वैभव मैन,मुकेश मैन यांचे विशेष सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने