वंचित बहुजन आघाडीचा भव्य शाखा उद्घाटन सोहळा संपन्न प्रतिनिधी राहुलकुमार अवचट दौंड




प्रतिनिधी 
राहुलकुमार अवचट
दौंड

 
दौंड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी भांडगाव शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडला.
 वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले 
 ज्येष्ठ मार्गदर्शक  उत्तम गायकवाड यांचे नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते 
यावेळी बोलताना उत्तम गायकवाड यांनी  प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेते आहेत जे सर्व बहुजनांचा विकास करू शकतील असे सांगितले,शाखेचे अध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
 यावेळी मा.संजय गायकवाड, भिमक्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी भाऊ वाघमारे, सचिव बापू जगताप , मा. विजय कदम , उपाध्यक्ष मा.कुमार रणधीर , युवराज दामोदरे , मा. आनंद रणधीर, मा. विशाल दामोदरे, मा. सिद्धार्थ रणधीर, कोरेगावभिवर उपाध्यक्ष योगेश मस्के , कुसेगावचे शुभम गायकवाड , अक्षय कोकाटे (संघटक) आदि मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी भांडगाव च्या शाखेमध्ये वेगवेगळ्या समूहाचे पदाधिकाऱ्यांनी आपणाहून सहभाग साधल्याचे नाविन्य दिसले. यावेळी मा. अश्विन वाघमारे यांनी शाखेचे उद्घाटन करून जमलेल्या समूहाला संबोधित केले. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने