दोडाईचा( अख्तर शाह)
दोडाईचा येथे आज महाविकास आघाडी, समाजवादी पार्टी,प्रहार, वंचित बहुजन आघाडीचा यांच्या वतीने केन्द्र शासनाने पारित केलेले तीन काळे कायदे हे शेतकरी विरोधी कायदे आहेत.या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात दोडाईचा येथे नंदुरबार चौफुली येथे रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले.यावेळी पदाधिकारी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्त रोको केला.यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली.शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अँड.एकनाथ भावसार,
राष्ट्रवादीचे अमित दादा पाटील
करनी सेनेचे महामंत्री राजू देशमुख,
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बापू महाजन
युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, राहुल माणिक,शहराध्यक्ष वसंत कोळी, युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पुष्पक पाटील, शिवसेनातालुका प्रमुख ईश्वर पाटील, तालुका उपविभागप्रमुख शैलेश सोनार, युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी,शहर प्रमुख सागर पवार , उपशहर प्रमुख मनोज परदेशी समाजवादी पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष उस्मान अशरफी, तालुकाध्यक्ष अकरम तेली, शहराध्यक्ष शाकिर लोहार,
संजुम खाटिक,
वंचित बहुजन आघाडी भुपेंद्र मोहितेयांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ११ वाजे दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूकीची कोंडी झाली चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली. नायब तहसीलदार आर बी मोरे, यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री दोंडाईचा तलाठी संजयगीर गोसावी यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक डॉ संतोष लोले आदी उपस्थित होते.
गेल्या दहा महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहेगेल्या दहा महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहे. केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज, २७ सप्टेंबरला 'भारत बंद' ची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडी, कामगार संघटना, विविध शेतकरी संघटनांसह वकील संघटनांनी देखील पाठिंबा दिला या बंदच्या पार्श्वभूमीवर आज दोंडाईचा येथे नंदुरबार चौफुलीवर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, एम.आय.एम. , केंद्रीय मानवाधिकार संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित दादा पाटील , दोंडाईचा वकील संघाचे अध्यक्ष अँड.एकनाथ भावसार, राष्ट्रवादीओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस बापू महाजन, काँग्रेसचे राहुल माणिक, वंचित आघाडीचे भुपेंद्र मोहिते आदींनी आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिका विषद केली.
राकासेठ ,दिनेश महाजन,हुसेन बोहरी, प्रदीप बागल,बापुजी मिस्तरी दादाभाई कापुरे,भोला कापुरे.अभिजित पाटील, संदिप पाटील,भुषण पाटील,आबिद शेख, मुन्ना खाटिक, जयदेव भोई, मंगल कोळी, योगेश कोळी, मोहसीन पिंजारी,मोनाशेख, भैय्या संदानशिव, मुश्ताक शाह,रतिलाल पाटील, अधिकार देवरे, आदी यावेळी उपस्थित होते
ए .पी.आय संतोष लोले. सी एस साळुंखे , मुकेश आहिरे यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आले.
Tags
news
