शिदंखेडा तालुक्यातील वरझडी येथे ठेलारी बांधवांची चौकडी वस्ती येथे महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार दीपकदादा गिरासे यांची सभा दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा (अख्तर शाह)
यांचे कॉर्नर सभा संपन्न झाली*
या सभेसाठी सर्व ठेलारी बांधव व हटकर बांधव यांनी स्वतःहून पुढाकार घेत कॉर्नर सभा लावली या सभेसाठी वरझडी व देगाव येथील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलतांना दीपक दादा म्हणाले या ठेलारी समाजाने वीस वर्ष भारतीय जनता पार्टीला प्रामाणिक मतदान करून देखील यांच्या साध्या समस्या सोडु शकले नाही वीज असेल पाणी असेल घरकुल असतील रस्ते असतील शाळा असेल अशा अनेक अडचणी ठेलारी बांधव सहन करत आहेत जरी मला ह्या वेळेस आपण प्रामाणिक पणे मतदान करून दिले, माझा विजय असो पराजय असो तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर राहील ही ग्वाही आज मारुती समोर साक्ष घेत देतो या सभेसाठी त्यांच्यासोबत मेथी येथील तालुका युवक अध्यक्ष चिराग माळी, ओबीसी सेलचे संघटक ईश्वर माळी, भिला बापू, हिरालाल पाटील, देगाव येथील बापू  पाटील, भुरा पाटील, वरझडी येथील सोनू गिरासे दीपक गिरासे, हेमंत पाटील , धोंडू ठेलारी, उदय ठेलारी, मोठ्या संख्येने ठेलारी बांधव अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने