खर्दे ता.शिरपूर येथील आर.सी.पटेल माध्य. व उच्च माध्य.विद्यालयात हिंदी दिन साजरा




तालुक्यातील खर्दे येथील आर.सी.पटेल  माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात हिंदी दिन विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
  हिंदी दिना निमित्त   विद्यालयात कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
   याप्रसंगी विद्यालयातील हिंदी विषय शिक्षकांचा सत्कार प्राचार्य पी. आर. साळुंखे यांनी बुके देऊन केला.हिंदी भाषेचे महत्त्व ए. जे. पाटील यांनी विशद केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील प्राचार्य पी.आर. साळुंखे यांनी हिंदी साहित्यातून व्यक्तीचे जीवन समृद्ध होते हे उदाहरण देऊन पटवून दिले.
कथाकथन स्पर्धेत प्रथम देवयानी ज्ञानेश्वर पाटील, द्वितीय स्मिता रवींद्र चौधरी, तृतीय दिव्या रवींद्र खोंडे , कार्तिक कन्हैया महाजन महाजन या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
कथाकथन कार्यक्रमाचे परीक्षण श्रीमती. मनीषा पाटील, पी.एस. अटकाळे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनवणे व आभार प्रदर्शन श्रीमती सुनंदा निकम  यांनी केले.
 कार्यक्रमाप्रसंगी  विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे, ए .जे. पाटील, पी .एस .अटकळे, बी. एस. बडगुजर, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी. एम. पवार,  मनीषा पाटील, सुनंदा निकम, सुनीता सुर्यवंशी,युवराज मिठभाकरे,साहेबराव कोळी, तारासिंग गिरासे, आबा वाडीले आदि उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने