ज्ञानदीप प्रतिष्ठान तर्फे बिलाडी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न



भारत सरकारच्या युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालय अंतर्गत येणारे नेहरू युवा केंद्र संलग्न ज्ञानदीप प्रतिष्ठान, बिलाडी यांच्या वतीने बिलाडी गावात युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटक आणि मार्गदर्शक म्हणून बिलाडी गावाचे सुपुत्र मा. सचिन शिंदे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावाचे प्रथम इंजिनियर श्री.आबा शिंदे, प्रमुख पाहुणे श्री.संतोष पाटील, अभिजित पगारे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज शिंदे हे उपस्थित होते.
          सध्या देशाची वाटचाल स्पर्धात्मक आहे. स्पर्धा परीक्षा आजच्या काळाची गरज आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण स्पर्धा शिवाय यश देखील मिळणार नाही. परंतु स्पर्धा करत असताना सामाजिक, शैक्षणिक हिताचा विचार केला पाहिजे, स्पर्धा परीक्षांचे मनावर कोणतेही दडपण न घेता, अध्ययन क्षमता, विषयाचे सखोल ज्ञान, वेळेचे महत्त्व व नियोजन, धैर्य, चिंतन, मानसिक स्वास्थ, डोळ्यासमोर ठेवून सहभाग घ्यावा, यशाची उंची फार दूर नाही, म्हणून युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी स्वतः अध्ययनशील बनुन यश संपादन करावे‌, असे विचार सचिन शिंदे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धुळे यांनी मांडले.
      पंकज शिंदे यांनी प्रास्ताविकात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचा हेतू आणि महत्व सांगितले व युवक-युवतींना आपल्या जीवनात स्पर्धा परीक्षांचे महत्त्व समजवले . 
      मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीतेसाठी पंकज शिंदे, अभिजीत पगारे, गोपाल सैंदाणे, पंकज ठाकरे, मोहित शिरसाठ, मयुर धनगर आदींनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने