विवाहितेचा छळ ; तीन वर्षीय मुलीसह सत्तावीस वर्षीय महिलेची आत्महत्या प्रतिनिधी दत्ता पारेकर




प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे: मुलगा होत नाही,तुला सर्व मुलीच आहेत.या कारणास्तव एका विवाहितेचा मागील अनेक दिवसापासून मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला.सातत्त्याने तिला सोडचिठ्ठी देण्याची भाषा करण्यात आली. या सततच्या त्रासास कंटाळून या विवाहितेने मंगळवारी दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विहिरीत आपल्या मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सौ.मनिषा महादेव दराडे वय 27 वर्षे ब कु.भाग्यश्री महादेव दराडे वय 3 वर्षे अशी मृतांची नांवे आहेत.या दोघीही इंदापूर तालुक्यातील अकोले गावच्या रहिवासी आहेत.

या घटनेबाबत मयत मनीषा दराडे हिचे वडील नवनाथ विठोबा खैरे वय .65 वर्षे धंदा – शेती राहणार दादेगाव ता.आष्टी जि.बीड यांनी भिगवण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिषाचा पती आरोपी महादेव चंद्रकांत दराडे व सौ.रुपाली शरद खैरे दोघे रा.अकोले, ता.इंदापूर यांविरुध्द भा.द.वि.का.क 498 अ , 306,504,506,34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.


 
भिगवण पोलीसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की, नोव्हेंबर 2020 पासून मनिषाने आत्महत्या करेपर्यंत तिचा मुलगा होत नाही या कारणावरून सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तिला सातत्याने मारहाण करण्यात येत होती. तिला सोडचिट्टी देण्याची भाषा सतत केली जात होती. यासोबत फिर्यादीची सून व मयत मनिषाचा पती यांच्यात अनैतिक संबंध होते.या सततच्या त्रासाला कंटाळून तिने इंदापूर तालुक्यातील सह अकोले येथील अशोक यशवंत गायकवाड यांचे विहीरीतील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली.अशी फिर्याद मयत मनीषाचे वडील यांनी दिली आहे.पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील हे करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने