धुळे जिल्हा परिषद पोट निवडणूक मालपूर गटातील जनतेला व उमेदवारांना दिग्विजयसिंग राजपुत यांचा सवाल?




       शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गटात पोट निवडणूक लागली असून राजकीय वारे वाहू लागले पंरतु कोणताही नेता असो माझा कुठल्याही नेत्याला विरोध नाही फक्त एक मनसे विध्यार्थ्यी सेनेचा कार्यकर्ता व जागृत तरूण  म्हणून तुम्हांला विचारतो की मालपूर धरणात येवढे समुद्र सारखे अपाट पाणी असून कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहो रामी असेल पथारे असेल या गावात मागील अनेक वर्षांपासून लोकांना पिण्यासाठी पाणी न होते गावात पाणीटंचाई ला लोकांना सामोरे जावे लागले आज या गावात लोकांनी निवडून दिलेल्या सरपंचांनी पाणीच पाणी केले आहे पंरतु सद्या शेतकऱ्यांना शेतात पाण्याची खुप गरज आहे कोणताही राजकारणी नेता असो त्यांनी विचार केला का ? की मालपूर धरणाचे पाणी बंद असलेल्या पाट चारी च्या माध्यमातून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू जेणेकरून शेतकरी हा पाणीदार होईल मालपूर धरणाचे व बलदाने धरणाचे पाणी पाटचारी च्या माध्यमातून सोडले तर धावडे,झिरवे,रामी-पथारे, निमगुळ असे अनेक गावांना याचा फायदा होईल पण हा विचार ऐ सफेद बगळे करणारच नाही कारण यांना माहीत आहे की आपण शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचवले तर आपल्या मागे कोणीही फिरणार नाही आपल्या सतरंज्या कोणीही उचलणार नाही कारण शेतकरी व शेतकऱ्यांचे मुल शेतात पाणी भरत राहतील पण त्यांना येवढे माहीती नाही की भारत हा शेती प्रदान देश आहे शेतकऱ्यांवर हा देश चालत असतो हा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे देशात शेतकऱ्यांच्याच जास्त आत्महत्या होताना दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या मुलांचे खुन व शेतकऱ्यांच्या मुलींवरच बलात्कार होताना दिसून येत आहे तरी सफेद बगळे गप्प आहेत मग जनतेने आता जागृत झाले पाहिजे.
     आपल्या देशावर कोरोना विषाणूजन्य वायरस ने थैमान घातले असताना आपल्या मालपूर गटात कोरोना मुळे किती लोकांनी जीव गमवला लोकांना रेमडिसीवर असेल ऑक्सिजन असेल अनेक सामान्य लोकांना तर बेड सुद्धा मिळाले नाही तेव्हा कुठे होते लबाड लांडगे जे आता निवडणुकीत मत मागण्यांसाठी घरोघरी फिरत आहेत निवडणूक लागली की लोकांना दारू पाजवून मटन मासे खाऊ घालत आहेत लाज नाही वाटत का ? जेव्हा आपल्या गटातील लोक कोरोना काळात उपाशी होते अनेकांनी जीव गमवला त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली का ? आणि आता निवडणुकीत लाखोंची उलाढाल करीत आहेत घाबरू नका जनता जागृत झालेली आहे ज्या उमेदवारांने कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली त्याच उमेदवाराला लोक त्यांचे अमूल्य मत दान करतील मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या तरूण मित्रांनो मत हे दान करण्याची गोष्ट आहे त्याला तुम्ही २०० आणि ३०० मध्ये विकू नका राजसाहेब ठाकरे म्हणतात की नेते लोक आपल्याला मेंढी व बकरीच्या लायकीत काढतात निवडणूक लागली का यांना दारू मटन मासे खाऊ घालून २०० ते ३०० रूपये देऊन विकत घेऊन घ्यायचे आणि पुढचे ५ वर्षे येणाऱ्या निधीत काळाबाजार करून आपले पैसे व्याज सहीत वसूल करायचे माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि तरूण मित्रांनो नेत्यांच्या घरी गेट वर कुत्र बांधलेलं असतं ते सुद्धा १० हजार च्या पुढे किंमतीत मिळते आणि आपण २०० ते ३०० मध्ये विकले जातो मग याचा वर विचार करा की आपली लायकी काय आहे ? तरी तुम्हांला हाथ जोडून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीत असा उमेदवाराला मत द्या की त्याने खरोखर निस्वार्थी समाजकारण केले कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली आणि तुम्ही निवडून दिल्या नंतर तो तुमच्या समस्या मार्गी लावेल आपण आज पर्यंत असे उमेदवार निवडून दिले आहेत ते निवडणूक झाल्यावर आपल्याला ओळखत सुद्धा नाही 5 वर्षे कुठे दिसत पण नाही मग मतदान केल्यानंतर लाज नाही तर अभिमान वाटला पाहिजे अशाच उमेदवाराला आपले अमूल्य मत दान करा जय महाराष्ट्र..!
आपलाच दिग्विजयसिंग राजपुत:- 9860679223



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने