पुणे प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या होत असलेल्या ई पीक पाहणी प्रकल्प कार्यक्रमाला शासनाने मुदतवाढ जाहीर केली असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व ज्या शेतकऱ्यांची पिकांची ई पीक पाहणी झाली नाही त्यांना इ पीक पाहणी करून घेण्यास यामुळे मदत होणार आहे .
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून राज्यातील जिल्हा समन्वयक उपजिल्हाधिकारी व समन्वय कृषी अधिकारी ई पीक पाहणी प्रकल्प अधीक्षक इत्यादींना याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्यात ई पीक पाहणी च्या खरीप हंगाम कालावधी वाढवून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यात शासन निर्णयानुसार राज्यव्यापी केलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत खरीप हंगामाच्या प्रत्यक्षही पाहणे मोबाईल ॲप द्वारे करण्यासाठी शेतकरी यांच्यासाठी 15 ऑगस्ट 15 सप्टेंबर असा कालावधी निश्चित करून देण्यात आला होता. त्यानंतर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत तलाठी स्तरावर होणारे पीक पाहणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र राज्याच्या काही भागात अतिवृष्टी पूर कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे आणि इ पीक पाहणे मोबाईल ॲप च्या थोड्या उशिरा च्या शुभारंभ यांचा विचार करून राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरील कामाची कालमर्यादा 15 सप्टेंबर वरून 30 सप्टेंबर 20 21 आणि तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची कालमर्यादा 30 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवण्यात मान्यता देण्यात आली आहे व तशा सूचना जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांना देण्यात आले असून याबाबत शेतकऱ्यांना निदर्शनास आणून द्यावे असेदेखील यात नमूद केले आहे.
Tags
news

