माहिती अधिकाराचा दणका शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोलगी ता. अक्कलकुवा यांना 5 हजार रुपयांचा दंड



शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ता युवराज पी माळी यांना माहिती देण्यास टाळाटाळ करून माहिती न दिल्याने राज्य माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ यांनी शाखा अभियंता व्ही. एम. पाटील यांना 5  हजार रुपये दंड करून शास्तीची कारवाई केली आहे.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की अर्जदार यांनी सदर विभागात माहिती अधिकारान्वये माहितीची मागणी केली होती मात्र मुदतीत माहिती न दिल्याने प्रथम अपील सादर करण्यात आले तरी देखील कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही म्हणून राज्य माहिती आयोग यांच्याकडे अपील सादर केले होते. सदर अपिलाच्या अनुषंगाने जनमाहिती अधिकारी यांना खुलासा सादर करणेबाबत आदेशित करण्यात आले होते सदरच्या खुलाशात जन माहिती अधिकारी यांनी कार्यभार स्वीकारताना तत्कालीन अधिकाऱ्यांनी दप्तर उपलब्ध करून दिले नाही म्हणून अर्जदारास माहिती देत देता आली नाही असा खुलासा सादर केला होता मात्र आयोगाने सदर खुलाचा अमान्य करून जन माहिती अधिकारी यांनी अर्जदार यांना अवलोकन ची संधी न देऊन माहिती पुरवण्यात हेतुपुरस्सर टाळाटाळ केली असे दिसून आल्याने माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 (1) अन्वये सदरची शास्ती ची कारवाई केली आहे व सदरची शास्तीची रक्कम  उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोलगी यांनी विद्यमान जन माहिती अधिकारी श्री पाटील यांच्या वेतनातून समान दोन मासिक हप्त्यात कपात करून रकमेचा भरणा शासकीय लेखाशीर्ष मध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी असे आदेश केले आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने