प्रा. श्री. महेश पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातर्फे पी.एचडी. प्रदान शिरपूर तालुक्यातील पळस ठरली आरोग्यदायी जीवाणूचा स्त्रोत



शिरपूर - येथील आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रा. श्री. महेश पाटील यांनी जागतिक स्तराच्या संशोधनातून 'फ्रुक्टोबॅसीलस फ्रुक्टोसस' नावाचा जीवाणू प्रथमच शिरपूर तालुक्यातील  ह्या औषधी वनस्पतीच्या फुलापासून शोधण्यात आला असून त्याची रूपात्मक, जैवरासायनिक आणि जनुकीय वैशिष्टांच्या आधारांवर ओळख राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे येथून करण्यात आली आहे. सदर जीवाणू हा दह्यामध्ये आढळणाच्या लॅक्टोबॅसिलस वंशाचा सदस्य आहे आणि तो मानवी आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो.

ह्या जीवाणूचा संशोधनादरम्यान 'प्रोबायोटिक्स' म्हणून मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला गेला आहे. यात रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजन, रोगजनकावर प्रतिबंध, प्रतिजैविक प्रभाव आम्ल व जठरातील रसाची सहनशीलता, पित्तातील मीठाची सहनशीलता, स्वयं एकत्रीकरण, सह एकत्रीकरण ई. अश्या विविध चाचण्या घेण्यात आल्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या पुराव्यावरून असे दिसून आले आहे की हा जीवाणू अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकतो.

तसेच ह्या संशोधना दरम्यान स्विस अल्बिनो नामक उदरावरच्या अभ्यासाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, हे जीवाणु प्रोबायोटिक्स म्हणून घेतल्याने वजन कमी होणे, हृदयाचे आरोग्य, पचन प्रक्रिया वाढवणे, तसेच इतर हानिकारक जीवाणूंच्या आळा घालून संक्रमण प्रतिबंधित करणे, जठराच्याच आतड्यांच्या आरोग्यात सुधारणा करणे,
त्याचबरोबर ह्या नवीन जीवाणूचा निवडक व प्रभावीपणे वापर करण्यासाठी जीवाणू युक्त सफरचंदाचे ज्यूस तयार करण्यात आले होते व त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या त्यात असे आढळले की, हे जीवाणू सफरचंद ज्यूम मध्ये अनेक दिवस टिकून राहण्यास सक्षम होते. तसेच ह्या अभ्यासाद्वारे असा निष्कर्ष काढता येईल की, ज्या लोकांना लक्टोज शर्करा पचवता येत नाही तसेच दुधाची अॅलर्जी किंवा उच्च कोलेस्टेरॉल अथवा चरबी समस्या असणारी माणसे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेण्यापासून वंचित राहतात अश्या लोकांसाठी पर्याय म्हणून नव्यानेच  शोधण्यात आलेल्या ह्या जीवाणू युक्त फळांचा रस निश्चितपणे प्रोबायोटिक्सच्या वितरणासाठी एक नवीन माध्यम म्हणून वापरला जाऊ शकतो. तसेच लोकांचे चांगले आरोग्य आणि पोषण वाढविण्यासाठी एक कार्यशील निरोगी पेव म्हणून देखील याचा वापर केला जाईल. तसेच ह्या संशोधनादरम्यान असे आढळले आहे की, हे जीवाणू अटीऑक्सिडंट्स पटक तयार करतात तसेच ह्या जीवाणूंचा प्रोबायोटिक्स म्हणून सेवन केल्याने मानवी शरीरातील पेशींच्या चयापचयातून तयार झालेल्या विषारी घटकांचा नाश करून कर्करोग, मधमेह, हृदयरोग तसेच अल्झायमर अश्या विविध महाभयकर आजारापासून वाचता येईल व त्याचे सेवन करणाऱ्यास दीर्घायुष्य देखील प्राप्त होऊ शकेल असे ह्या सर्व पुराव्या आधारे मांडण्यात आले आहे. अश्या ह्या संशोधनातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावीन्यपूर्ण निरोगी अन्न उत्पादन विकासाला चालना मिळेल असे नमूद करता येईल.

सदर संशोदनादरम्यान शिरपूर तालुक्यातील अनेक फुले, फळे व मधमाश्यावर संशोधन करून विविध आरोग्यदायी जीवाणू शोधण्यात आलेत आणि अजुनही बरेच आरोग्यदायी जीवाणू हा परिसरात असू शकतात असा अंदाज ह्या संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे.

प्रा. श्री. महेश पाटील यांचे ह्या संशोधनावर आधारित शोधनिबंध नामांकित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकात प्रकाशित झाले असून त्यांनी अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. प्रा. पाटील हे मागील १५ वर्षांपासून आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात अध्ययन, अध्यापन व संशोधनाच कार्य करीत आहेत.

सदर संशोधनाच्या कार्यासाठी प्रा. श्री. महेश पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने पीएच डी पदवी प्रदान केली आहे. त्यांचा संशोधनाचा विषय हा "स्टडिज ऑन लक्टिक असिड बॅक्टेरिया फ्रीम टी रिच निचेस' असा होता. ह्या संशोधनासाठी शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. उल्हास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर संशोधनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री अमरिशभाई पटेल यानी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्राची प्रयोगशाळा अद्ययावत व जागतिक दर्ज्याच्या उपकरणांनी सुसज्ज करून उपलब्ध केल्यामुळे ह्या संशोधनासाठी प्रोत्साहन मिळाले व त्यात यश देखील प्राप्त झाले आहे. तसेच प्रा. श्री. महेश पाटील यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, उमविचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डी. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ आर. डी. जाधव, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. रविंद्र पाटील, विभागप्रमुख डॉ. संदीप पाटील, श्री. गणेश सोनार, संजय मोरे, बन्सीलाल चौधरी, दशरथ पटेल, लक्ष्मीकांत मोरे, मेहल गुजराधी, संदेश राजपूत, तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून भावी संशोधनाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने