राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने covid-19 महा लसीकरण मोहीम शिरपूर तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन



शिरपूर प्रतिनिधी  - राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनानिमित्ताने मा. जिल्हाधिकारी सो धुळे व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ जिल्हा परिषद धुळे यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात दिनांक 2 ऑक्टोंबर 2021रोजी covid-19 महा लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे त्या निमित्ताने धुळे जिल्ह्यात एका दिवसात 50 हजार पेक्षा जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून शिरपूर तालुक्यात एका दिवसात 12000 पेक्षा जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे .
तरी या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सो,तहसीलदार सो, गटविकास अधिकारी सो व तालुका आरोग्य अधिकारी सो  शिरपूर यांनी केले आहे.
यापूर्वी शिरपूर तालुक्यात शहर व ग्रामीण भागात लसीकरण मोहीम प्रभीवी पणे राबवण्यात येत असून शिरपूर तालुक्यात पहिला डोस एक लाख 68 हजार 376 लोकांनी म्हणजेच 42. 29 टक्के लोकांनी घेतला असून दुसरा डोस 51 हजार 508 लोकांना म्हणजेच 32 . 12 टक्के लोकांना देण्यात आला आहे .त्यामुळे उर्वरित लोकांनी  लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने