धुळे - कोरोना लॉकडाउनच्या संकटातून कसाबसा शेतकरी बाहेर पडत आहे. नव्या उमेदीने त्यांने भाजीपाला व कांद्याचे उत्पन्न घेतले पण आज सद्यस्थितीला भाजीपाला व कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहे. कांद्याच्या भावात होणारी प्रचंड घसरण पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार ने मिळून थेट शेतकऱ्यांकडून 30 रुपये किलो दराने थेट कांदा खरेदी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सध्या स्थिती पाहता कांद्याचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यात साठवून ठेवलेल्या कांदा सतत असल्यामुळे कांद्याचे वजन कमी होऊन शेतकऱ्यांचे तेही खूप मोठे नुकसान होत आहे. सध्या कांदा 10 ते 12 रुपये किलोने घेतला जात आहे.त्यामध्ये उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. म्हणून सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकत्र करत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने स्थानिक प्रशासनाला निवेदने दिली आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, राज्य प्रवक्ता शैलेंद्र पाटील, कोर कमिटी सदस्य जयदीप भदाणे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा धुळे जिल्हा अध्यक्ष जयदीप पवार यांनी शासनाला ऑनलाइन निवेदन दिले आहे.कांद्याचे भाव 30 रुपये दराने खरेदी करा अन्यथा खरेदी न केल्यास संघटना आक्रमक पवित्रा उचलत रास्तारोको आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची टिकवण क्षमता पाहता कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीस काढावा असे आव्हान युवा जिल्हाध्यक्ष जयदीप पवार यांनी केले आहे.
Tags
news