शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चांदसे चांदसूर्या येथील ग्रामसेवक राजेंद्र सोनू महाले यांना ग्रामपंचायत कारभारात अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपात गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे यांनी निलंबित केले आहे. व निलंबनाच्या अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायतींना देण्यात येणारे 15 वा वित्त आयोगाचे कामाच्या निधी चेकद्वारे न करता पी. एफ. एम.एस. द्वारे करण्यात यावे अशा सूचना प्रशासनाने दिले आहेत मात्र चांदसे चांदसूर्या या ग्रामपंचायत मध्ये विस्तार अधिकारी यांनी जाऊन दप्तर तपासणी केली असता संबंधित ग्रामसेवक यांनी पी. एफ. एम .एस. द्वारे पेमेंट न करता चेकद्वारे 3 लाख 92 हजार 636 रुपयांचे पेमेंट गैर हेतूने केलेले निदर्शनास आले .
शिवाय या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक ग्रामपंचायत जी. पी. राठोड यांनी देखील आपल्या अहवालात नमूद केले आहे की ग्रामसेवक आर .एस .महाले यांनी प्रशासनाची डीएससी परस्पर तयार करून प्रशासक यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व विश्वासात न घेता 15 वा वित्त आयोगाच्या खात्यातून 4 लाख 1 हजार 700 रुपयांचा अपहार केला आहे.
शिवाय माहिती अधिकार कार्यकर्ता माधवराव फुलचंद दोरीक यांनी ग्रामपंचायत चांदसे चांदसूर्या येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत रस्ता खडीकरण बाबत केलेल्या तक्रारीत चौकशीकामी उपस्थित राहण्याचे आदेश करून देखील ग्रामसेवक चौकशीकामी उपस्थित राहिले नाहीत.
त्यामुळे शिरपूर तालुक्याचे गट विकास अधिकारी वाय .डी .शिंदे यांनी सदर ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला आहे.
Tags
news