हिवाळी पर्यटनासाठी पर्यटन महामंडळाकडून विविध सवलती........ प्रतिनिधी दत्ता पारेकर



 
प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे : करोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाने बहुतांश निर्बंध शिथिल केले आहेत. 
त्यामुळे आगामी हिवाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 
(महाराष्ट्र पर्यटन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एम.टी.डी.सी.) 
पुणे विभागाने पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. 
दरम्यान, निर्बंध शिथिल केले असले,
 तरी अद्याप पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. त्यामुळे केवळ निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यासाठी महामंडळाची सर्व निवासस्थाने खुली आहेत. 
गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे टाळेबंदी, विविध निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या पर्यटकांना मनमोकळे पर्यटन करण्याला मर्यादा आहेत. 
मात्र, घरी बसून कंळलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यास परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. 
महामंडळाची पुणे विभागातील सर्व निवासस्थाने सुरू असून  www.mtdc.co  या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. 
याबाबत बोलताना महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, 
‘करोना नियंत्रणात राहिल्यास ऑक्टोबरपासून पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू होणार आहे.
 दरवर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या सुट्यांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक पर्यटनाचे नियोजन करतात. 
करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देताना निवासस्थानांची संपूर्ण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 
निवासस्थानी येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून गरज भासल्यास पर्यटकांच्या मागणीनुसार पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने