प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले़ त्यातून ती गर्भवती राहिल्यावर खालच्या जातीची असल्याचे सांगून लग्नास नकार देणार्या कोथरुडमधील एका कुटुंबावर पोलिसांनी बलात्कारासह अनुसुचीत जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
श्रेयस दत्तप्रसाद जोशी भाग्यश्री दत्तप्रसाद जोशी आणि दत्तप्रसाद जोशी (रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने कोथरुड
पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १९ जून २०१९ ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस जोशी याने फिर्यादी या अनुसुचीत जातीच्या आहेत, हे
माहिती असताना सुद्धा त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याबरोबर वारंवार बळजबरीने शरीर संबंध केले. फिर्यादी यांनी त्यांचे प्रेमसंबंध श्रेयस याच्या आई वडिलांना सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ करुन तू खालच्या जातीची आहे. आम्ही तुझा स्वीकार करणार नाही, असे सांगितले. या शरीरसंबंधातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. तेव्हा श्रेयस याने लग्न करण्याचे टाळून फिर्यादी यांच्या आईला औरंगाबाद येथे बोलावून शिवीगाळ केली व जीव मारण्याची धमकी दिली आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे तपास करीत आहेत.
Tags
news