प्रतिनिधी :- शहादा
शहादा तालुक्यातील कमरावद येथिल जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक महेंद्र सीताराम वाघ यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता शिक्षण विभागाने निलंबन करुन अन्याय केल्या प्रकरणी शिक्षकाने 30 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा जाहीर इशारा दिला आहे.या संदर्भातील निवेदन संबंधित शिक्षकाने शिक्षणमंत्र्यां सहीत शिक्षण संचालक तसेच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहे.
या संदर्भात कमरावद येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षक महेंद्र वाघ यांनी शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मी सन सप्टेंबर 2014 साला पासुन कमरावद येथील जिल्हा परिषद शाळेवर उपशिक्षक म्हणून कामकाज पाहत आहे. वस्ती शाळेच्या माध्यमातून माझी उपशिक्षक या पदावर नियुक्ती झाली आहे. कामाचा पुरेसा अनुभव नसल्याचे कारण दाखवुन मला व्यवस्थित मार्गदर्शन न करता मुख्याधिपिका यांनी 5 ते 6 दिवसा पर्यंत शाळेत रुजु करुन घेतले नाही.म्हणुन वरिष्ठांनी मुख्याध्यापिका विजया बोरसे यांना तोंडी कडक समज दिली त्यामुळे त्यांनी मला नंतर कामावर रुजु करुन घेतले मात्र रुजु करुन घेतल्या नंतर विजया बोरसे यांच्या कडुन सतत जातीवाचक बोलून हिनवले जात होते असे निवेदनात म्हटले आहे. तक्रारकर्ते महेंद्र वाघ यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की मुख्याध्यापिका विजया बोरसे या वारंवार मला माझ्या जातीवरुन बोलून अपमानित करीत होत्या तर दुसरीकडे विजया बोरसे यांचे पती अनंत शिंदे हे देखील राजकीय दबावतंत्राचा वापर करुन मला सतत दबावात ठेवून निलंबित करण्याच्या धमक्या देत असत.
महेंद्र वाघ यांनी शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार देखील चव्हाट्यावर आणला आहे..त्यात शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल व केंद्रप्रमुख एस एस अहिरे हे पंचायत समिती शहादा येते रुजू झाल्यापासून..गरीब व लाचार शिक्षकांवर विविध कारणास्तव अन्यायाचा कळस गाठन्याचे काम केले आहे..नेहमी श्रीमंत व राजकीय वर्चस्व असलेल्या शिक्षकांना पाठीशी घालून .दीर्घकालीन बेकायदेशीर रजा मंजूर करून आपल्या पदाचा गैरवापर केला आहे..म्हणून डोंगरगाव केंद्राची विद्यार्थ्यानची ची गुणवत्ता कमालीची ढासळून बोगस अध्ययन पद्धत्ती दाखवून शासनाची फसवणूक करतात...असे तक्रार कर्त्याने शिक्षण विभागाशी असलेला सर्व लेखा जोखा आपल्या तक्रारीत स्पष्ट केला आहे. महेंद्र वाघ यांनी वार्षिक तपासणीचे एक हजार रुपये दिले नाहीत म्हणून डोंगरगाव केंद्राच्या व्हाट्सअप्प ग्रुप मधून काढण्याचा प्रकार माझ्या सोबत घडला आहे.. तसेच दि 8/7/2021 रोजी तक्रारी चौकशी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारीनकडे देखील दिला होता..या दृष्टीने माझ्या वर सूडबुद्धीने व पूर्ववैमनश्यातून मला चौकशीचा अर्ज असून मला गट शिक्षण अधिकारी उषा पेंढारकर मॅडमांनी दुसऱ्या वर्गात थांबायला सांगून विजया बोरसे यांचा पैसे दिलेला पोषण आहाराचा तांदूळ उरवून त्यांना वाटप केलेल्या लोकांना बोलाऊन सूडबुद्धीने माझा खोटा अहवाल तयार करून शिक्षण अधिकारी राहुल पाटील यांच्याकडे रवाना केला..जातीय द्वेषापाई राहुल चौधरी शिक्षण अधिकारी नंदुरबार यांनी सी.ई. ओ नंदुरबार पाठवून मला 21-9-21 पासून महेंद्र वाघ यांना शिक्षक पदावरून निलंबित केले आहे... या सदर प्रकारची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.....शिक्षण अधिकारी नंदुरबार ,ममता पटेल (विस्ताराधिकारी)शहादा, एस ,एस, अहिरे केंद्रप्रमुख डोंगरगाव ,विजया बोरसे मुख्याध्यापक कमरावद ,उषा पेंढारकर मॅडम गट शिक्षण अधिकारी ,यांनी खोटा अहवाल सादर केल्या प्रकरनी व आपल्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात यावे..विजया बोरसे मुख्यध्यापक याना अनुसूचित जाती प्रबंधक कलमानवै अटक व्हावी...असे न झाल्यास 30-9-21 रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी नंदुरबार,येथे आत्मदहन करेल असे महेंद्र वाघ यांनी शिक्षण विभागास आत्मदहहनाचा इशारा नंदुरबार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांना जाहीर नोटीस द्वारे दिला आहे......
Tags
news
