किसान समन्वय समितीतर्फे सांगवी येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन,तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा सहभाग



शिरपूर - शेतकरी विरोधी कायदयाला व शेतकरी हितासाठी देशातील विविध संघटनांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात शिरपूर तालुक्यात किसान सभेसह इतर राजकीय पक्षांनी सहभागी होत आंदोलन केले.तसेच तालुक्यातील सांगवी येथे  रास्ता रोको करीत केंद्र सरकारचा निषेध करून सोमवारी दुपारी विविध मागण्यासह अधिकाऱ्यांना निवेदन दिले         
              देशात मोदी सरकारच्या जनविरोधी व कार्पोरेट धार्जिण्या आणि देशविकाऊ धोरणामुळे देशातील शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक व राजकीय पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी २७ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सकाळी शिरपूर शहरातील पाच कंदील परिसरात आंदोलन करून रॅली काढून प्रांताधिकारी कार्यलयात निवेदन देण्यात आले.तसेच तालुक्यातील येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून शांततेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले 
     याप्रसंगी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष हिरालाल परदेशी,मदन परदेशी,संतोष पाटील राष्ट्रीय काँग्रेस,मनोहर पाटील,राष्टवादी काग्रेसचे व्ही यु पाटील,शिवसेनेचे भरत राजपूत, राजू टेलर,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अर्जुन कोळी,प्रहार जनशक्ती पक्षाचे ईश्वर बोरसे,आदी राजकीय, सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते,आणि शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते. 
           आंदोलनाच्या ठिकाणी एपीआय सुरेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर शहरात पीएसआय किरण बा-हे,आर एन मोरे,हेमंत पाटील, पोकॉ जाधव आदी कर्मचारी  व सांगवी येथे पीएसआय नरेंद्र खैरनार,दीपक वारे,यांनी कर्मचाऱ्यांसह मोठा बंदोबस्त ठेवला होता.सांगवी येथे रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने