मुंबई - धुळे नंदुरबार अकोला वाशिम व नागपूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकांच्या स्थगितीच्या केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे .
पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गत रिक्त पदांच्या निवडणुकांच्या साठी देखील याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 06 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी आज केली आहे.
धुळे नंदुरबार अकोला वाशिम नागपूर या 5 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या निवडणुकांसाठी 19-7-2021 रोजी मतदान होणार होते परंतु सर्वोच्च न्यायालयाने 06 जुलै 2021चे आदेश आणि राज्य शासनाने covid-19 मुळे पोट निवडणूक स्थगित करण्यात केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 09 जुलै 2021 रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. याप्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजी चे covid-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकीसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे तसेच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबत काही आदेश दिले आहेत हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने आता निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यात सर्व ठिकाणी 15 सप्टेंबर 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील.
21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल नामनिर्देशन पत्र संदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2019 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील व 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान व 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल .जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोट निवडणुकांसाठी हे मतदान होईल यासाठी या संदर्भातील आवश्यक ते सर्व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लक्षात घेण्यात यावी असे असे निर्देशही देण्यात आले आहेत.
Tags
news


