माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आर. सी. पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे दि. १४ सप्टेंबर मंगळवार रोजी भव्य रक्तदान शिबीर



शिरपूर : माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आर. सी. पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे दि. १४ सप्टेंबर मंगळवार  रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

महाविद्यालयाच्या ग्रंथालय हॉल मध्ये सकाळी १० वाजता संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिरास सुरुवात होणार असून सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत अखंड वेळ हे शिबीर सुरु राहणार आहे. यात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह इतर सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे.बी.पाटील व संयोजक असलेल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या सदस्यांनी केले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने