आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त "प्रवास सायकलचा, जागर आरोग्याचा" उपक्रम संपन्न




शिरपूर : येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालया तर्फे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त "प्रवास सायकलचा, जागर आरोग्याचा" हा सायकल रायडींगचा उपक्रम नुकताच संपन्न झाला.

आ.अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १४ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील यांनी दिली.

आ.अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आरोग्य संवर्धनाच्या उद्दिष्टाने संस्थास्तरावर "ऍम्बिशन-2021" क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. या अंतर्गत महाविद्यालयाने "प्रवास सायकलचा, जागर आरोग्याचा" या उपक्रमाच्या माध्यमातून सायकल रायडींगचे आयोजन केले होते. यात ५ व १० किलोमीटर अंतर सायकल रायडींगचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले होते. शिरपुरातील वरझडी रोड वरील जलशुध्दिकरण केंद्रापासून सुरु झालेल्या या सायकल प्रवासाचे उद्घाटन संस्था सीईओ डॉ.उमेश शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.
या वेळी स्वायत्त महाविदयालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुराणा, इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे, आय.एम.आर.डी. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, प्राचार्य डॉ.नितीन हासवाणी, महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा.डॉ.नितीन पाटील, प्रा.प्रवीण सरोदे, प्रा.डॉ.विजय पाटील, प्रा. गणेश तपकिरे, प्रा.डॉ.सतीष देसले, कुलसचिव डॉ प्रशांत महाजन, या उपक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ जे.बी. जाधव आदी उपस्थित होते. यात १८० स्पर्धकांनी नाव नोंदणी केली व त्यातील १५० स्पर्धक या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी झाले. विशेष म्हणजे यात महिला स्पर्धाकांचा सहभाग उल्लेखनिय होता. निसर्गरम्य वातावरणात वरझडी गावाकडे जाणाऱ्या घाटसदृश्य हिरवाईने नटलेल्या वळणदार रोडवर सायकलिंग करण्याचा आनंद घेत बहुतांश स्पर्धकांनी १० किमी अंतर कापत सायकलिंग राईड पूर्ण केली. महाविदयालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील आणि संयोजक चमूने रायडींग पूर्ण केलेल्या सर्व सहभागी स्पर्धकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या स्पर्धेच्या आयोजन व व यशस्वी संपन्नतेसाठी साठी प्रा.डॉ.जे.बी.जाधव, प्रा. पी. के. पाटील, ग्रंथपाल महेश सोनवणे यांनी काम पाहिले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने