शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबीर व वृक्षारोपण





शिरपूर : शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व वृक्षारोपण दि. १४ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
 कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हमाल मापाडी भवन येथे सकाळी ९ वाजेपासून सायंकाळपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांना शिरपूर शहर व तालुक्यातील मान्यवरांनी, शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, सर्व संचालक यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने