दोंडाईचा शिवारात नऊ एकर कापसाच्या पिकाचे नुकसान नगरपालिकेकडून भरपाईची मागणी;अपर तहसीलदारांना निवेदन दोंडाईचा (अख्तर शाह)



                             
दोंडाईचा (अख्तर शाह) 

दोंडाईचा  येथील लाला भटा धनगर रा राऊळ नगर दोंडाईचा यांच्या मालकीचे शहराजवळ नगरपालिका हद्दीतील रमाई नगर  जवळ वणी रस्त्यावर 10 एकर क्षेत्र आहे त्यापैकी 8 ते 9 एकर क्षेत्रात  गेल्या 15 दिवसापासून डुकरांनी थैमान घातले आहे त्यात माझ्या कापसाच्या पिकाचे नुकसान केले असून दुष्काळात तेरावा महिना आधीच परिस्थिती बिकट आणि यामुळे उपासमारीची वेळ आली असून मला भरपाई मिळावी यासाठी अपर तहसीलदार सुदाम महाजन यांना निवेदन दिले आहे त्यांच्या निवेदनानुसार नगरपालिका हद्दीत डुकरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असून माझ्या झालेल्या नुकसानीस नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे मात्र त्यांनी मला नुकसान भरपाई मिळावी मी गरीब असून माझ्या कापसाचे नुकसान झाल्याने मी संकटात सापडलो आहे माझ्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करावा व नुकसान भरपाई नगरपालिकेकडून मला मिळावी यासाठी प्रयत्न व्हावा अशी मागणी लाला धनगर यांनी निवेदनात केली असून अपर तहसीलदार सुदाम महाजन यांच्याकडे केली असून जिहाधिकारी धुळे व पोलीस स्टेशन दोंडाईचा यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने