शिरपूर : माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिरात ९१ दात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ. प्रशांत महाजन यांनी दिली.
आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय हॉल मध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते झाले. या वेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, कैलासचंद्र अग्रवाल, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, फिरोज काझी, राधेश्याम दायमा, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसेवक भुरा राजपूत, राजू एजंट, संतोष माळी, विनायक कोळी, नवजीवन ब्लड बँक धुळे चे डॉ. सुनील चौधरी, जीवन ज्योती ब्लड बँक धुळे चे ज्ञानेश्वर पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविद्यालय ऑनलाईन माध्यमातून सुरु असूनही अनेक विद्यार्थ्यांनी तसेच एन.एस.एस. स्वयंसेवक व शहरातील, तालुक्यातील नागरिक असे एकूण ९१ जणांनी रक्तदान केले.
महाविद्यालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, मुख्य परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, प्रा.डॉ.नितीन पाटील, प्रा.प्रवीण सरोदे, प्रा. जी.व्ही.तपकिरे, प्रा.विजय पाटील, प्रा. डॉ.सतीष देसले, प्रा. मिल्केश जैन, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.प्रशांत महाजन तसेच शिबिराचे समन्वयक प्रा. विजय सूर्यवंशी, प्रा.एम.आर.पाटील, प्रा. नितीन शिंदे, प्रा. पी. एस पाटील, प्रा.महेश पाटील, प्रा.एस.एस. सेरागी, प्रा.अमित महिरे, प्रा. मनोज पटेल, प्रा.अनुप जयस्वाल, प्रा.शैलेंद्र परदेशी, प्रा. प्रीती सांजेकर, प्रा.किरण सूर्यवंशी, प्रा. मिलिंद सोनवणे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
news

