प्रतिनिधी
राहुलकुमार अवचट
मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो यांनी जिल्ह्यातील फरार आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते . वरील आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक जुने रेकॉर्ड वरील फरार आरोपी यांचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून यवत पोलिस स्टेशन गु र नं 25/ 1980 भा द वी 395 या गुन्ह्यातील आरोपी नामे **अंकुश माणिक गायकवाड वय 58 वर्षे रा खडकी ता:-करमाळा जि:- सोलापूर* हा गुन्हा घडले पासून तब्बल ४१ वर्षे फरार होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास सापळा रचून करमाळा खडकी रोडवर जनावरे चरायला घेऊन फिरत असताना शिताफीने ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हा केला असल्याचे सांगत आहे यावरून त्यास पुढील तपास करीता वैद्यकीय तपासणी करून यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .
सदरची कारवाई ही
पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके
पो उप निरीक्षक शिवाजी ननवरे
पो हवा विजय कांचन
पो कॉ धिरज जाधव
पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे
Tags
news
