आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुकटी येथे शालेय साहित्य वाटप व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन



धुळे तालुक्यातील मुकटी येथे धुळे ग्रामीणचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१९ रोजी भव्य नेत्र रोग निदान शिबिराचे परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे,या कार्यक्रमात तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच गावातील व परिसरातील गरजू रुग्णांसाठी नेत्र रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,या शिबिरात
 मनीषा नेत्र चिकित्सालय अँन्ड पॅरामेडीकल कॉलेज धुळे येथील नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ.तुषार सामुद्रे यांच्या उपस्थितीत दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी १०  वाजता भव्य नेत्र रोग निदान शिबिर संपन्न होणार आहे,या शिबिरात रुग्णांच्या
चष्माचे नंबर काढून देण्यात येतील,तसेच मोतीबिंदू व काचबिंदू यांसारख्या आजारांवर निदान व त्यावर शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, व मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी विशेष सूट देण्यात येईल,या शिबिरात प्रा.आमोद पाटील संकल्प फाउंडेशन धुळे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे,
तरी गावातील व परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षल साळुंके यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने