विरेगाव/प्रतिनिधी दि:15 (गणेश शिंदे)
जालना तालुक्यातील भिलपूरी येथील प्रकाश गोरे या शेतकर्याची गाय चोरुन तीला भूलीचे इंजक्शन देवून स्काॅर्पिओ गाडीत टाकून घेवून जाणार्या चोरांचा संशय मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहीकेचे चालक विजय सोनवणे यांना आल्याने त्यानी रस्त्याने जातांना निरखेडा येथील बाबूराव जाधव नावाच्या व्यक्तीला माहीती दिली. त्यांनी सदरची माहीती पोलीस पाटील प्रदिप जाधव यांना दिली त्यांनी सदरची माहीती मौजपूरीचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांना देताच राञगस्तवर असणारे अमलदार यांनी निरखेडा येथे धाव घेवून निरखेडा येथील गावकर्यांच्या मदतीने चोरांचा शोध घेतला असता, गावकरी व पोलीस आल्याचे पाहून जनावर चोर स्काॅर्पिओ वाहन व त्यात चोरी केलेल्या 02 गाई सोडून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.प्रकाश गोरे यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे मौजपूरी येथे गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोउपनि/राकेश नेटके हे करत आहे.सदरची कार्यवाही मा.श्री.विनायक देशमुख पोलीस अधिक्षक जालना, मा.श्री.विक्रांत देशमुख अपर पोलीस अधिक्षक जालना, मा.श्री.राजू मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर, मा.श्री.सुभाष भुजंग पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास मोरे, पोहेकाॅ दादा हरणे, चालकपोहेका ज्ञानोबा बिरादार यांनी पार पाडली.
Tags
news
