प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: घरात खेळत असताना गळ्याला पडद्याचा फास बसून एका आठ वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
निगडीच्या रुपीनगर भागात ही घटना घडली.
सुमय्या शफील शेख
(वय ८, रा. त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, रुपीनगर, निगडी),
असे या बालिकेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दुपारी अडीचच्या सुमारास तिचे आईवडील बाजारपेठेत गेले होते.
सुमय्या घरात खेळत होती.
तिने बुरखा घातला होता.
घरातील पडद्याला असलेल्या नळीला विळखा बसून गळ्याला फास लागला.
त्यानंतर ती बेशुद्ध झाली.
उपचारासाठी तिला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तथापि, तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
या प्रकरणी चिखली पोलिसांनी अकस्मात मयत नोंद केली आहे,
अशी माहिती चिखली ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोन्याबापू देशमुख यांनी दिली.
Tags
news