धमनार ग्रामपंचायत मध्ये पति राज ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार



साक्री प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धमनार येथील ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच असून सरपंचांचे पती ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करत असून ग्रामपंचायतच्या मिटींगला हजेरी लावत असल्याची तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक त्र्यंबक बच्छाव यांनी केली असून याबाबत कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी धुळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे, व गटविकास अधिकारी साक्री यांना त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की साक्री तालुक्यातील धमणार ग्रामपंचायत चे ग्राम पंचायत सदस्य दीपक त्र्यंबक बच्छाव यांनी आपल्या तक्रारीत ग्रामपंचायत मध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याची तक्रार केली असून दिनांक 31 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या मासिक मिटिंग मध्ये सरपंच अनिताबाई रावसाहेब सोनवणे यांची पती रावसाहेब उत्तम सोनवणे हे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना मासिक मिटिंग मध्ये हजर होते व ग्रामपंचायत च्या कामात हस्तक्षेप करत होते याबाबतच्या व्हिडिओ चित्रण तक्रारदार यांनी केली असल्याचे खुलासा त्यांनी केला आहे. आणि म्हणून कारवाईची मागणी केली आहे .
याशिवाय या पंचायतीच्या ग्रामसेवकांनी मासिक मिटिंग मध्ये झालेल्या ठरावांची प्रोसिडिंग ची प्रत मला देण्यास नकार दिला असून 15 वा वित्त आयोग आतून आलेला निधी व त्यातून झालेला खर्च याबाबतची माहिती देण्यात देखील टाळा टाळ केली आहे .म्हणून या कामांच्या चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे
याशिवाय धमनार सारख्या गावात रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून गटारी नाले तुडुंब भरले आहेत त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे लोक आजारी पडत आहेत व आदिवासी वस्तीत व ठेलार वाड्यात प्रचलित घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीला सूचित करून देतील दखल घेतली जात नाही त्यामुळे या सर्व गैरप्रकारांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली असून एका आठवड्याच्या आत चौकशी न झाल्यास 17 सप्टेंबर 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या तक्रारीची चौकशी करून प्रशासन काय कारवाई करते याकडे धमणार ग्रामवासी यांचे लक्ष लागून आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने