दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती प्री- प्रायमरी रोटरी इंग्लिश स्कूल व श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल येथे गणेशोत्सव शाळेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह व प्राचार्य श्री एम. पी. पवार यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला. या परंपरागत उत्सवात गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी प्रभावी ठरणाऱ्या कोवॅक्सिन लस संशोधनात भारतीय संशोधकांना मिळालेल्या यशाचा व कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या भारतीयांच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा देखावा साकारण्यात आला होता.या सातदिवसीय गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन रंगभरण,चित्रकला,मॉरल एग्जिबिशन,कविता सादरीकरण स्पर्धा व शिक्षकांसाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून बलून ब्लास्ट,बँगल्स गेम,पकर अप, इअर बडस् इ.मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
गणरायांच्या निरोपप्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह व सौ.हेतलं शाह यांच्या हस्ते आरती करण्यात आली व भारतीयांबरोबरच अखिल मानवजातीच्या आरोग्यदायी जीवनासाठी गणरायाकडे प्रार्थना करून विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले. यावेळी इंचार्ज सौ. बतुल बोहरी,सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
Tags
news
