दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती तातडीने सुरू करा, शिंदखेडा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने निवेदनादवारे मागणी. *🔹विशाल रवींद्र बागल* *🔹शिंदखेडा तालुका प्रतिनिधी* *🔹मो.न.9307845388*




*🔹विशाल रवींद्र बागल*
*🔹शिंदखेडा तालुका प्रतिनिधी*

दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती तातडीने सुरू करा, शिंदखेडा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शिंदखेडा तहसिलदार निवेदन देण्यात आल्याची माहिती गुरुवार दि 16 सप्टेंबर रोजी शिंदखेडा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एकत्र येण्यास बंदी घातली आहे. त्यामूळे सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया देखील बंद आहेत. सैन्यात दाखल होण्याची इच्छा असणाऱ्या हजारो तरुणांनी पोलीस भरती असो सैन्य भरती असो याची तयारी केली आहे. मात्र भरती बंद असल्याने शेकडो तरुण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थांसाठी राज्यभर निवेदन देण्यात येत आहेत. ह्याच पार्श्वभुमीवर देशातील सैन्य भरती ताबडतोब सुरू करावी, पाच वर्षे सैन्य भरतीची वयोमर्यादा वाढविण्यात यावी, निमलष्करी दलात 1 लाख 27 हजार रिक्त पदे असून केवळ 25 हजार पदांसाठी शासनाने भरतीची जाहिरात काढली आहे. ती जाहिरात पूर्ण 1 लाख 27 हजार पदांसाठी काढण्यात यावी यासह वर्षाला किमान दोन वेळा भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. जर तत्काळ मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राहूल पाटोळे, सामजिक कार्यकर्ते अजय पान पाटील, कलीम शेख, विकिभाई खाटीक, विनोद बोरसे शहरातील सामजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने