आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट.



आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी मुंबई येथे पक्षश्रेष्ठींची भेट घेत तालुक्यातील पक्षाच्या कामाचा आढावा व संघटनात्मक कार्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे. 

 राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, हुंडाई च्या शहराध्यक्ष एडवोकेट एकनाथ भावसार युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे पाटील शिंदखेडा तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे मधुकर तावडे कार्याध्यक्ष दयाराम कुवर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे पक्षाचे निरीक्षक अर्जुन टिळे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांची मुंबईत भेट घेऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील संघटनात्मक अहवाल सादर केला. प्रसंगी पक्षश्रेष्ठींचा सोबत आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली , खेडा तालुक्यातील पक्षाच्या कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत भविष्य शोधण्यापेक्षा भविष्यात इतिहास घडवा असे मार्गदर्शन करत पक्षाच्या संकट काळात ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली अशा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वशक्तीनिशी उभा असल्याचा संदेश अजित पवार यांनी याप्रसंगी दिला असल्याची माहिती दोंडाईचा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष एडवोकेट एकनाथ भावसार यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने