मेथी परिसरात फेब्रुवारी महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना द्या, मेथी गणाचे दीपक गिरासे यांची मागणी.



शिंदखेडा तालुक्यातील मेथी परिसरात फेब्रुवारी महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले त्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी मेथी गटाचे दीपक गिरासे यांनी शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदनाद्वारे केल्याची माहिती दीपक गिरासे यांनी गुरुवार दि. 16 सप्टेंबर रोजी दिली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील परिसरात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यात प्रामुख्याने गहू चा हंगाम असल्याने सर्व गहू तयार झालेला असताना वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहूचे नुकसान झाले व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने  नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दीपक गिरासे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने