शिरपूर : तालुक्यातील करवंद धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी पाटचारीतून थेट विखरण एस्केप गेट पर्यंत पोहोचले असून शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
करवंद धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी भूजल पातळी वाढण्यासाठी तसेच परिसरातील असंख्य शेतकरी बांधवांच्या जमिनीत जल पुनर्भरण होण्यासाठी सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे भूजल पातळीत वाढ तर होतच आहे. शिरपूर पॅटर्नच्या अनेक बंधाऱ्यांमध्ये हे पाणी जाऊन ते बंधारे भरण्यास मदत होऊन परिसरातील शेतजमिनी व भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होत आहे.
करवंद धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी पाटचारीतून थेट विखरण एस्केप गेट पर्यंत पोहोचले असून विखरण येथील एस्केप गेटमधून पाणी शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांमध्ये जात आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव पाटील, शिरपूर पॅटर्नचे तुकाराम दोरीक, शेतकरी, ग्रामस्थ यांनी बुधवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी भेट देऊन पाहणी केली.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने जलपुनर्भरण होण्यासाठी करवंद धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोडण्यात आले होते. अर्थे, भरवाडे, विखरण एस्केप हे पुनर्भरणासाठी आ. अमरिशभाई पटेल यांनी निर्माण केलेल्या शिरपूर पॅटर्नच्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांचे पुनर्भरणमुळे पाण्याची पातळी वाढून बागायती क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
Tags
news
