गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी द्या आणि त्या बदल्यात फळाचे वृक्ष घ्या या अनोखा उपक्रमास जनतेचा भरभरून प्रतिसाद कदाचित महाराष्ट्रील पहिलाच अनोखा उपक्रम भुसावलातील नाना पाटील सर यांची संकल्पना





भुसावळ-  येथील गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नगरपरिषद भुसावळ व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना व इतर दुष्परिणाम होऊ नये म्हणून विविध ठिकाणी गणरायाच्या मूर्तीचे संकलन करण्यात आले. म्युन्सिपल हायस्कूल जामनेर रोड येथेही गणराया मुर्ती संकलन केंद्र होते या केंद्रावर गणरायाची मुर्ती द्या व फळाचे वृक्षरोप भेट घ्या हा उपक्रम नाना पाटील सर यांनी मुख्याधिकारी संदीपजी चिद्रेवार यांच्या मार्गदर्शन खाली राबविला यावेळी डी. वाय एस पी सोमनाथ जी वाकचौरे यांनी ही आपल्या घरच्या गणरायाची मुर्ती चि . अन्वय वाकचौरे याच्या हस्ते मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांना संकलनासाठी देण्यात आली त्यावेळी श्री चिद्रेवार साहेब यांनी श्री वाक्‌चौरे साहेब यांना वृक्ष भेट देऊन मुर्ती द्या आणि एक फळाचे झाड घ्या या उपक्रमाचे उद्घाटन केले . यावेळी अनेक संकलनासाठी आलेल्या मुर्त्या स्वतः वाकचौरे साहेब आणि चिद्रेवार यांनी स्विकारून गणेश भक्तांना फळाचे वृक्ष भेट दिले .
यावेळी या उपक्रमाची संकल्पना मांडणारे नाना पाटील सर यांनी या उपक्रमाबाबत माहीती सांगताना गणराया हे सर्व भाविकांचे जनतेचे श्रद्धास्थान आहे . देवाचा मिळालेला प्रसाद आपण मोठ्या भक्तीभावाने तो घेतो असतो आणि त्यांचे पावित्र ही जपत असतो . त्याचा विचार करून जर आपण गणेश भक्तांना मुर्ती च्या बदल्यात प्रसाद रुपी फळाचे झाड दिले तर नागरिक ते मोठ्या श्रध्देने भक्ती भावाने जगवतील आणि अशा नागरिकांचा पुढील वर्षी गणपतीच्या काळात सत्कार करू या कारण झाड लावून नुसते चालणार नाही तर ते जगवले गेले पाहिजे हे साध्य होणे हा उपक्रमाचा मुख्य उदेश होय .

यावेळी Dysp सोमनाथ  वाकचौरे यांनी मार्गदर्शन करताना मूर्ती गणरायाची मूर्ती द्या आणि या मोबदल्यात एक फळाचे झाड द्या हा अनोखा उपक्रम असून कौतुकास्पद आहे कारण कोरोना कालावधीमध्ये वृक्ष च महत्व जनतेला कळालं आणि त्या भावनेचा आधार घेऊन आज संकलनासाठी आलेल्‍या मूर्तीच्या बदल्यात फळाचे झाड देत आहेत एक विशेष उपक्रम असून महाराष्ट्रात कदाचीत पहिला असेल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन च्या माध्यमातून विविध ठिकाणी मूर्तींचे संकलन केंद्र केलेले आहे कोणत्याही स्वरूपाचे कोरोना बाबत चे दुष्परिणाम निर्माण होऊ नये तसेच दुर्घटना ही टळाव्यात म्हणून  हा संकलनाचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे जनतेचाही खूप भरभरून याला प्रतिसाद मिळत त्याचबरोबर वृक्ष जगविणाऱ्या गणेश भक्ताचा सत्कार ही आयोजक पुढील वर्षी करणार आहे असे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले .

 त्यानंतर मुख्याधिकारी संदीप जी चिद्रेवार यांनी या उपक्रमाच्या आयोजकांचे कौतुक करून गणरायाची मूर्ती संकलन करा आणि फळाचे वृक्ष घ्या हा उपक्रम समाजाला अतिशय दिशादर्शक असून प्रसादाच्या रूपात मिळालेले झाड नागरिक नक्कीच त्याचे संगोपन संवर्धन करतील आणि जी फळाची झाडे दिलेली आहेत ती झाडे जैवविविधतेला अनुसरून पशुपक्ष्यांसाठी आवश्यक असलेली आहेत त्यामुळे जैवविविधतेचे चे सुद्धा यानिमित्ताने जतन होईल संरक्षण होईल त्याचबरोबर संकलन केल्यामुळे होणाऱ्या अनेक दुर्घटना टळतील असे प्रतिपादन त्यांनी केले .

यावेळी   " श्री रिदम मल्टी स्पेशालिटी  हॉस्पिटल, हार्ट,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर " व निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सर,रघुनाथआप्पा सोनवणे यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आला त्याला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला . या ठिकाणी २१० गणेश मूर्ती चे संकलन झाले तर १८४ गणेश भाविकांनि फळ झाडे स्विकारली. 

  मुन्सिपल हायस्कूल जामनेर रोड भुसावळ या ठिकाणी  गणरायाची मूर्ती   संकलनासाठी दिल्या  त्या कुटुंबाला एक फळाचे झाड भेट देण्यात आले . त्या झाडाचे वर्षभर संगोपन आणि संवर्धन करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे पुढील वर्षी गणेशाच्या आगमनाच्या वेळी सत्कार करण्याचा नियोजन करण्यात आले .
   असे  नाना पाटील सर रघुनाथ सोनवणे  त्याचप्रमाणे श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. गणेश पाटील,डॉ. अमोल पाटील,डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत  नागला,डॉ. महेश पांगळे ,डॉ. कुशल पाटील व श्री रिदम मेडिकलचे संचालक गौतमजी चोरडिया यांनी केले आहे .
  मुर्ती संकलन साठी नगर परिषदेचे कर्मचारी चंद्रकांत येवले राजेंद्र पाटील नगीन सोनार. पोलीस विभागाचे राजेंद्र पाटील यांनी ही सहकार्य केले न पा चे गौरव अहिरे लोकेश ढाके आरोग्य अधिकारी वसंत राठोड यांनी ही मादर्शन केलें
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठि .. श्री संजय ताडेकर श्री ज्ञानेश्वर घुले सुरेंद्र सिंग पाटील निशांत पाटील गिरीश भंगाळे. गजानन महाजन विकास बिऱ्हाडे .. यांनी परिश्रम घेतले



चौकट मध्ये
उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी  दिला घरगुती गणेश
या उपक्रमाला सहभाग देत उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी स्वतः त्यांच्या घरी बसविलेल्या श्री गणेशाची मूर्ती या मूर्ती चिं. अन्वय वाकचौरे च्या हस्ते संकलन केंद्रात जमा करून उपक्रमास सुरुवात केली यावेळी ती मुर्ती मुख्याधिकारी यांनी संकलन केली . यावेळी आयोजक नाना पाटील यांनी फळ झाड भेट दिले . या प्रसंगी भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रेवार यांनी देखील उपस्थिती दिली. यावेळी श्री रिदम हॉस्पिटलचे डॉ. लक्ष्मीकांत नागला , गौतम चोरडिया व  पर्यावरण प्रेमी उपस्थित होते . त्याचप्रमाणे नःपा चे इंजिनिअर गौरव जी अहिरे शी लोकेश ढाके आरोग्य अधिकारी श्री वसंत राठोड यांचे ही या उपक्रमास सहकार्य लाभले या उपक्रमास सर्व पत्रकार बंधू देखील उपस्थित होते . कदाचित महाराष्ट्रात असा अनोखा उपक्रम पहिलाच असू शकतो यांची सर्वत्र चर्चा होती

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने