*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेला शिवसेनेच्या *जनता दरबाराचा* पुनश्च प्रारंभ आज सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आला. या जनता दरबाराला जनतेच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून प्रदीर्घ काळानंतर जनता दरबार पुन्हा सुरू झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते, गोरगरीब, कष्टकरी जनता यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेच्या जनता दरबारात घेऊन गेलेली कामे तत्काळ मार्गी लागत आहे. शिवसेनेचा जनता दरबार लवकरात लवकर सुरू करावा मागणी अनेकांनी केली होती. मात्र covid-19 व शासनाच्या मार्गदर्शक नियमांमुळे जनता दरबार सुरू करता आला नाही. आगामी दिवसात जर covid-19 चा प्रादुर्भाव वाढला नाही तर नियमितपणे जनता दरबार सुरु राहील असे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचा जनता दरबार गरिबांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा सुर जनतेमध्ये उमटत आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, दोंडाईचा उपजिल्हा संघटक कल्याण बागल, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, उपतालुकाप्रमुख चंद्रसिंग ठाकूर, तालुकासमन्वयक विनायक पवार, अँड. वसंत पवार, विभाग प्रमुख नंदू दोरीक, दराणेचे मनोज पाटील, किशोर माळी, युवासेनेचे शहरप्रमुख योगेश माळी, प्रा.अनिल माळी, भटु अहिरे, गुलझारसिंग गिरासे, विनायक पाटील, नरेंद्र गिरासे, कमलेश पाटील, युवराज भामरे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
Tags
news
