उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील पथकाकडून खर्दे शाळेत RT-PCR तपासणी ...



शिपुर - तालुक्यातील खर्दे येथील आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात कर्मचारी व विद्यार्थ्यांची RTPCR तपासणी करण्यात आली.
गेल्या दोन ते तीन वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना करून या आजारावर आळा कसा घालता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तिसऱ्या लाटेत कोणालाही कोरोणाची लागण होऊ नये किंवा आरोग्याच्या तक्रारी   उदभवू नये म्हणून खबरदारी म्हणून आरोग्य विभागा कडून  RT-PCR चाचणी करण्यात येत आली. 
     विद्यालयातील विद्यार्थ्यास किंवा कर्मचाऱ्यास सर्दी, खोकला, ताप याची लक्षणे जाणवल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा या संदर्भातली माहिती आरोग्य विभागाकडून विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांना देण्यात येत आली. 
  RT-PCR चाचणी तपासणी डॉ. शालिग्राम नेरकर डॉ. रश्मी आर कामडे, श्री. भरत बी. वाल्हे, श्रीमती सविता  जे. पावरा, यांनी विद्यार्थ्यांना तसेच विद्यालयातील कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात  मार्गदर्शन केले.
    यावेळी अमोल सोनवणे,हितेंद्र देसले,बी एस बडगुजर, ए जे पाटील, पी एस अटकळे,मनीषा पाटील,सीमा जाधव,डी एम पवार,सुनीता सूर्यवंशी,सुनंदा निकम,युवराज मिठभाकरे आदी उपस्थित होते.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने