वर्शी ता.शिंदखेडा येथील माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक श्री यशवंत निकवाडे यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था ,जळगाव तर्क नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीम.संदिपा वाघ यांनी कळविले आहे. श्री.यशवंत निकवाडे यांनी आतापर्यंत केलेले शैक्षणिक श्रेत्रातील उत्तम कामगिरी,अनेक वर्षांपासून करत आलेले विधायक कामाची दखल घेत संस्थेने त्यांची निवड केली. आतापर्यंत यशवंत निकवाडे यांचे शैक्षणिक श्रेत्रातील काम, सामाजिक श्रेत्रातील काम,उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे.त्यांनी आतापर्यंत चार पुस्तके लिहलेली आहेत, त्यांचे अनेक ठिकाणी व्याख्यानेपण झालेली आहेत त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात येत आहे.त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.हा पुरस्कार मिळाल्याने अजून एक पुरस्काराची भर पडेलेली आहे. .त्यांना हा पुरस्कार लवकरच प्रधान करण्यात येणार आहे. असे संस्थेच्या अध्यक्षा श्रीम.संदिपा वाघ यांनी कळविले आहे.त्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags
news

