राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी दिनेश मोरे



शिरपूर - काल दि. 28.08.2021 रोजी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा. नागेश फाटे साहेब प्रदेश दौर्‍यावर असतांना काल धुळे येथे आले त्यावेळी उद्योग व व्यापार विषयी आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील उद्योग व व्यापार माहिती घेतली. 
त्या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष.फाटे साहेब यांनी उद्योग व व्यापार बद्दल येणार्‍या अडचणी  विविध मार्गदर्शन केले तसेच जिल्ह्यातील प्रमुख सेल च्या अध्यक्षांना भेट म्हणुन विठ्ठल मूर्ती दिली तद्नंतर उद्योजक दिनेश मोरे यांची उद्योग व व्यापार आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्त पत्र देऊन नियुक्ती केली.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष मा. किरण शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष. रणजीतराजे भोसले, महिला जिल्हाध्यक्ष. सौ. ज्योती पावरा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष. मयूर बोरसे, सामाजिक न्याय विभाग धुळे जिल्हाध्यक्ष. महेंद्र शिरसाठ, शिरपूर  व्यक्ता प्रशिक्षण जिल्हाध्यक्ष. राजेंद्र चौधरी, धुळे ता.अध्यक्ष.राजेंद्र चितोडकर शिरपूर ता.अध्यक्ष. शिरीष पाटील, शिंदखेडा ता.अध्यक्ष. डॉ. कैलास ठाकरे, दोंडाईचा शहर अध्यक्ष.अँड एकनाथ भावसार, धुळे जिल्हा उपाध्यक्ष. नीलेश गरुड, धुळे जिल्हा विद्यार्थी माजी अध्यक्ष. गौरव बोरसे, धुळे शहर जिल्हाध्यक्ष. राज कोळी,  शिरपूर युवक ता.अध्यक्ष आशिष अहिरे, युवक धुळे ता.अध्यक्ष सागर पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष. प्रशांत पाटील, युवती जिल्हा सरचिटणीस. योगिता गिरासे, शिरपूर विद्यार्थी शहर अध्यक्ष.भूपेश पाटील, युवा उद्योजक तथा युवक विधानसभा क्षेत्र अध्यक्ष.धिरज सोनवणे अदी उपस्थित होते यावेळी प्रस्तावना डॉ. राहुल साळुंके यांनी केली तर आभार दोंडाईचा शहर अध्यक्ष.अँड एकनाथ भावसार यांनी मानले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने