शिरपूर .. येथील किविप्र संस्थेच्या एसपीडीएम वरिष्ठ व डॉ पां रा घोगरे कनिष्ठ महाविद्यालयात संस्थाध्यक्ष व जि . प . धुळेचे अध्यक्ष मा ना . भाऊसो डॉ तुषार रंधे व संस्थेच्या कोषाध्यक्षा मा ताईसो आशाताई रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मातोश्री स्व सावित्री ताई रंधे स्मृतिदिना निमित्त आणि राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त एस. पी. डी. एम महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम संस्थेचे सचिव मा नानासो निशांत रंधे संस्थेचे विश्वस्त व कुलसचिव मा रोहित रंधे मा श्री . दिलीप देवरे मा श्री . मुकेश वर्मा मा अंकिता लोखंडे , प्राचार्य डॉ . व्ही एम पाटील व्यवस्थापक मा श्री ए ए पाटील व मा श्री किशोर बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .
या प्रसंगी गुणवंत क्रीडापटू व त्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच . लाईफ स्कील डेव्हलपमेंट योगा अँड वेलनेस या क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाइन कोर्स चे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . तसेच या प्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.एल.के.प्रताळे यांचे योगा व फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्टस या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.फुला बागुल, उपप्राचार्य प्रा . पी जी पारधी उपप्राचार्य प्रा. सदाशिव ठाकरे सर,महाविद्यालयाचे न्याक समन्वयक डॉ.दिनेश भक्कड, महाविद्यालयाचे नवनियुक्त कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय निकम सर प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.दिलीप देवरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की खेळाडूंनी नेहमी उत्साही राहिले पाहिजे,खेळ व अभ्यास यांचा योग्य समन्वय साधला तर मोठ्या स्तरावर आपण पोहचू शकतो,त्यांनी आपल्या मनोगतामध्ये क्रीडा क्षेत्रातील घडामोडीबद्दल आपले मत मांडत उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचे व पालकांचे मने जिंकली.
शिरपूर क्रीडा नगरीतील खेळाडूंचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला,त्यात सोनवणे नयन,जाट मनिष,पावरा सुनीता, शिरसाठ सुरज,गिरासे ललित, सोनगडे श्रद्धा,पाटिल राज,भामरे राजश्री,सोनवणे महेंद्र,वाघ हर्षवर्धन, यादव अल्पेश,शिरसाठ प्रीती,धनगर विनोद,शिरसाठ हेमंत,लुकेश सिसोदिया या खेळाडूंनी राज्य,राष्ट्रीय,विद्यापीठ स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा व त्यांच्या आई वडीलांचा क्रीडा गुण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासो. निशांतजी रंधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या वतीने खेळाडुंचा गुणगौरव होणं हे शिरपूर शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी बाब आहे आणि भविष्यात शिरपूर क्रीडा नगरीतुन असे खेळाडू घडतील की ते आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नावलौकिक करतील.
या कार्यक्रमाची प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम पाटिल यांनी केले,सूत्रसंचालन भरत कोळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राधेश्याम पाटील सर यांनी केले.
Tags
news