हस्ती स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा ! दोंडाईचा (अख्तर शाह)




दोंडाईचा (अख्तर शाह)

दोडाईचा  हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज दोंडाईचा तर्फे शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांचे मार्गदर्शनाने '  हस्ती स्पोर्टस् ग्राउंड ' येथे दि.२९ ऑगष्ट २०२१ रविवार रोजी ' हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद ' यांची जयंती ' राष्ट्रीय क्रीडा दिन ' म्हणून उत्साहात साजरी करण्यातआली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी तसेच प्रमुख अतिथी म्हणून सायकलपटू व दंतशल्य चिकित्सक डॉ. प्रविण गोस्वामी हे लाभले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकानंतर इ.१० वी. च्या विद्यार्थीनी समृद्धी सांगळे व वैष्णवी कागणे यांनी आपल्या मनोगतातून मेजर ध्यानचंद यांचे जीवन चरित्र आणि क्रीडा क्षेत्रातील महान कार्याविषयी माहिती सांगीतली. यानंतर डॉ. विजय नामजोशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थ्यांना खेळांचे महत्व विषद केले. तसेच विद्यार्थ्यानी सुदृढ शरीर, निरामय आरोग्यसाठी विविध खेळ खेळावेत. खेळांमुळे जबाबदारीची जाणीव निर्माण होते. सोबतच आपल्या आवडीच्या खेळात उंच यशोशिखर गाठण्यासाठी  सरावात सातत्य राखावे. असे प्रतिपादन केले. 
विशेषत: राष्ट्रीय खेळ दिनाचे औचित्य साधून हस्तीची राष्ट्रीय फेन्सिगपटू कानन जैन व राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू दिव्येश तिरमले या खेळाडूंचे यथोचित कौतुक करून सन्मान करण्यात आला. सोबतच यादिवशी विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल आणि क्रिकेट या खेळांच्या सांघीक स्पर्धा; तसेच वर्गनिहाय गट वार विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. यात ' अ ' गट इ. १ ली. व २ री. मेजर ध्यानचंद यांचे चित्र, धावणारा खेळाडू, कबड्डी अथवा खो-खो खेळतांना खेळाडूंचे चित्र काढून रंगभरण करणे, गट ' ब ' इ.  ३ री ते इ. ५ वी. - छायाचित्रात दिलेल्या खेळाडूवर निबंध लेखन स्पर्धा, गट ' क ' इ. ६ वी. ते ८ वी. - एशियन गेमस् , कॉमन वेल्थ गेमस् -  ऑस्ट्रेलिया व ऑलिम्पिक गेमस् २०२० - जपान या विषयांवर सचित्र माहितीसह प्रोजेक्ट तयार करणे, गट ' ड ' इ. १ ली. व इ. १० वी. करिता ऑनलाइन प्रश्नमंजुषा सोडविणे अशा स्पर्धांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेची हेड गर्ल् सिमरन अग्रवाल हिने; तर  हेड बॉय आयुष भामरे याने आभार प्रदर्शन केले.
वरील राष्ट्रीय क्रिडा दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हस्ती स्कूल क्रिडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, क्रिडा शिक्षक दुर्गेश पवार, विशाल पवार, जितेंद्र सुरवाडे, निलेश धनगर, क्रिडा शिक्षिका पुष्पा साळवे व सेवक निलेश भामरे यांनी परिश्रम घेतले.
हस्ती स्कूल येथे दरवर्षी नियमितपणे दिन विशेष अंतर्गत अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याद्वारा विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रीडा प्रकार खेळण्याची आवड निर्माण होते; सोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वागीण विकासास चालना मिळते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने