शिरपूर : तालुक्यातील उमर्दा परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती, घरांचे तसेच झाडांचे नुकसान झाले होते. आ. काशिराम पावरा यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रशासनाला सूचना दिल्या. सर्व नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
शनिवारी दि. २९ मे रोजी दुपारी शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील काही गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. याबाबत
माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच प्रशासनाने सर्व नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय स्तरावरून तातडीने मदत करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
मंगळवारी दि. १ जून रोजी सकाळी आ. काशिराम पावरा यांनी उमर्दा व इतर भागात जाऊन नुकसानीचा अंदाज घेऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
नुकसान पाहणी करताना यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, समाज कल्याण सभापती सौ. मोगरा जयवंत पाडवी, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, सरपंच शिवाजी वसावे, पंचायत समिती माजी उपसभापती जगन टेलर, ग्रामपंचायत सदस्य कातरसिंग पाडवी, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाडवी, सिताराम तडवी, स्वीय सहाय्यक सुनील जैन, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
उमर्दा परिसरात दि. २९ मे रोजी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वारा सुटला व वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वीज महामंडळाने वीज तारा व विजेचे पडलेले खांब त्वरित दुरुस्त करावे अशा सूचना देण्यात आल्या. उमर्दा परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले. लालसिंग आबला वसावे, मनीलाल कालुसिंग पाडवी, मोहन रायसिंग पावरा, जामा पोहल्या पावरा, गोपाल हुनार पाडवी, करमसिंग भारता पावरा, भारता कलजी पावरा यांचेही नुकसान झाले. महसूल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत.
Tags
news

