युवकांसाठी पुण्यश्लोक अहिल्या मातेचे कार्य मार्गदर्शक - अंकिता पाटील अंकिता पाटील अहिल्यारत्न पुरस्कार सन्मानित




प्रतिनिधी दत्ता पारेकर 
 
 पुणे :पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्तराजे यशवंतराव होळकर युवा संघ व तेजपृथ्वी ग्रुप, इंदापूर यांच्या वतीने इंदापूर येथील कोर्टासमोर झालेल्या समारंभात कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय व बहुमोल सामाजिक कार्याबद्दल पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात यांच्या हस्ते अंकिता पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
  अंकिता पाटील म्हणाल्या की "आहिल्यारत्न" हा अहिल्यादेवींच्यां नावाने दिला जाणारा पुरस्कार मला प्रदान केल्यामुळे मला अजून कार्य करण्यास नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे व जबाबदारी वाढली आहे.'
   यावेळी ॲड.राहुल मखरे, अनिताताई नानासाहेब खरात,विलासबापू वाघमोडे, महेंद्र रेडके, आप्पासाहेब माने, नानासाहेब खरात, गोरख शिंदे, माऊली चवरे ,पोपट पवार, शकील सय्यद उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने