"प्रेम " हा अडीच अक्षराचा शब्द आहे.पण त्याच्यात जग जिंकण्याची ताकद आहे.प्रेम जवळ असले म्हणजे पैसा आणि यश पण सहज मिळत असते.प्रेम म्हणजे काय?प्रेम म्हणजे ह्या हृदयाचे त्या हृदयी घालावे त्यालाच प्रेम म्हणावे.पण आता अस प्रेम कुठेच दिसत नाही.परीवारात एकत्र जमलेले असतांना सर्वांनी प्रेमाने,जिव्हाळ्याने बोलले पाहिजे.पण तस दिसत नाही.प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. जो तो मोबाईल वर व्यस्त असतो. ना कुठला एकमेकांशी संवाद ना प्रेम. परीवार प्रमुख असतो तोच फक्त पैशाचा विचार करत असतो.तो पण प्रेमाचा विचार करत नाही.बाजारात पण व्यापारी पण फक्त पैसा कसा आपल्या कडे एवढाच विचार करत असतो. त्यालाही प्रेमाशी काही घेणे देणे नाही.शेजारी सुद्धा आपलीच प्रगती कशी ह्याचाच विचार करत असतो.पण प्रेमाचा विचार करत नाही.दवाखान्यात पण डॉक्टर फक्त पैशाचाच विचार करतात प्रेमाचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे पण वेळ नाही.राजकारणी लोक पण निवडणूकीच्या वेळी फक्त खोटे आश्वासन देतात.त्याच्याकडे फक्त स्वार्थच दिसतो.प्रेमाचा लवलेश ही त्यांच्याकडे दिसत नाही.जनता पण पुढारी निवडून येण्यासाठी पैसे वाटतात ते घेऊन समाधान मानतात. पण प्रेमाचा ते पण विचार करत नाही.प्रत्येक व्यक्ती हाच विचार करतो कि फक्त मलाच यश मिळायला पाहीजे.माझाकडेच पैसा असला पाहिजे. मीच श्रीमंत झालो पाहीजे.पण कुणालाच अस वाटत नाही की आपल्याकडे प्रेम पाहिजे.त्यांच्या दृष्टीने पैसा आणि यश यांना प्रथम क्रमांक आणि शेवटी वेळ उरलाच तर प्रेमाला थोडेफार वरवर गोंजारतात. कुणीही प्रेमाला प्रथम प्राधान्य देत नाहीत. आणि जोपर्यंत प्रथम प्राधान्य प्रेमाला मिळत नाही तोपर्यंत यश व लक्ष्मी टिकत नाही.
एका घराच्या दारात तीन पाहुणे येवून उभे राहिले.घरातली गृहिणी बाहेर आली तीने पाहुण्यांना विचारले तुमचे नाव काय? एकाने सांगीतले मी आहे पैसा,याचे नाव आहे यश व तो तीसरा आहे त्याचे नाव आहे प्रेम.गृहिणी विचारते,तुम्ही उपाशी दिसत आहेत घरात या मी तुम्हाला जेवायला देते.त्या तीन पाहुण्यापैकी एकाने गृहिणीला सांगीतले.तुमचे पतीदेव घरी आहेत का? ती म्हणते, नाही. ते म्हणतात मग घरात येणार नाही.थोड्या वेळात पतीदेव घरी आले तीने पतीला सर्व सांगीतले.पती म्हणाला मग अगोदर पैशाला बोलाव जेवायला ,आपण मालामाल होवून जावू,मजेत राहू .पत्नी म्हणते आपण यशाला बोलवू,आपली प्रगतीच प्रगती राहिल.तेवढ्यात घरात त्यांचे लहान मुलगी होती ती म्हणाली.आई बाबा आपण अगोदर प्रेमाला बोलवू .घरात किती आनंदी आनंद राहिल.त्यांनी तसच ठरवलं आणि प्रेमाला घरात जेवायला बोलावले .प्रेमाचा पाठीमागे पैसा आणि यश आपोआप आले.फक्त पैशाला अगोदर बोलावल असत तर तर यश आणी प्रेम मागे आले नसते.यशाला अगोदर बोलावल असत तर पैसा आणि प्रेम मागे आले नसते.त्यांनी खूप छान केले अगोदर प्रेमाला बोलावले आणी यश व पैसा आपसूकच त्यांच्याजवळ आले.
तात्पर्य हेच की अगोदर प्रेम निर्माण होवू द्या यश व पैसा आपोआप येईल. आपण नेमके उलटच करतो.म्हणून समाधानी होवू शकत नाही.
कोई दौलत पे नाज करते है।
कोई शोहरत पे नाज करते है।
जिसके पास ढेर सारा' प्यार' हो
हम तो सिर्फ उनपे नाज करते है ।
Tags
news

