श्री संभाजी महाराज यांच्या इतिहासाला अनुसरून न केलेल्या विकृत लेखनाच्या निषेधार्थ निवेदन

 





शिरपूर - लोकसत्ता चे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेले (रीनेइसन्स स्टेट) या ग्रंथात धर्मवीर श्री संभाजी महाराजांबद्दल प्रष्ठ क्रं ७६ वर टीका केली आहे, गिरीश कुबेर यांनी धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या इतिहासाला अनुसरून न केलेल्या विकृत लेखनाच्या निषेधार्थ व प्रशासनाने सदर पुस्तकावर सर्वत्र त्वरीत बंदी आणुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू या मागणीचे निवेदन आज मा, तहसीलदार, आबा महाजन शिरपुर याना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपुर विभाग तर्फे देण्यात आले या वेळी उपस्थित धारकरी 
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपुर विभाग प्रमुख जयेश पाटील, तालुका कार्याध्यक्ष वावाड्या उर्फ आनंद पाटील, शिवछत्रपती प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष, क्रिष्णा भैय्या पाटील, दादा मराठे,जितु कोळी, क्रिष्णा मराठे, प्रथमेश गोसावी, चिराग सोनवणे, पंकज बुवा, जयेश पाटील,चेतन येवले, ओम काशिद, भुपेश धाकड, कल्पेश शिंपी, राहुल जाधव, दुर्गामाता दौड नियोजन प्रमुख सोनु शेटे आदी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने