नक्कल करायला पण अक्कल पाहिजे




समाज जीवनात वावरत असतांना अनेक लोकांच्या आपण संपर्कात येतो.संपर्कात येणारे लोक भारदस्त वाटतात. त्यांच्या बोलणे,कपडे त्यांच्यासवयी,त्यांच्या रूबाबदार पणा याच्यामुळे ते आपल्या मनात घर करून  जातात.मग तो एखादा नेता,अभिनेता ई.पैकी कोणीही असू शकतो.त्यांचे बोलणे, चालणे,वागणे या गोष्टींच्या आपल्या मनावर एवढा प्रभाव पडतो कि आपल्याला पण त्यांच्या सारखे बनण्याची ईच्छा होते.हळू हळु  आपण त्यांचे अनुकरण करायला लागतो.आपल्याला पण त्यांच्या सारखे बोलता आले पाहिजे.आपण पण त्यांच्या सारखे दिसायला पाहिजे.अस वाटायला लागते.पण कोणीही व्यक्ती नक्कल करून  समोरच्या व्यक्ती सारखा होवू शकत नाही.प्रत्येक व्यक्तीचे एक खास  असे व्यक्तीमत्व असते. त्याचे अनुकरण  केले जावू शकत नाही.नक्कल करायला पण अक्कल लागते.नाहीतर आपलं हसे होत असते.
 एकदा एका श्रीमंत व्यक्तीचे इमारतीचे बांधकाम  चालू असते.तो  श्रीमंत व्यक्ती खुर्चीवर बसून कामाचे निरीक्षण करत असतो.तेवढ्यात त्याची पत्नी त्याच्या साठी पाणी घेवून येते.तो मालक पाणी तोंडात घेतो आणि आपल्या पत्निचा तोंडावर  फवारा मारतो.ती लाजते,हसते आणि हसत परत जाते.अशा घटना मोठ्या लोकात होतात  त्यांना त्याचे काही वाटत नाही.उलट त्यांना मजा वाटते.त्यांच्या इमारत बांधकामांसाठी अनेक लोक काम करत असतात. त्याच्या पैकी एक मजूर या शेठ शेठानीचे  निरीक्षण  करत होता.त्याने आपण घरी गेल्यावर  आपल्या पत्नीसोबत असच करावे अस ठरवले.काम संपले तो घरी आला.तो पर्यंत संध्याकाळीच होवून अंधार  झालेला होतो.पत्नी संध्याकाळचे जेवन तयार  करत  होती.ती पोळ्या लाटत होती. ह्याने बाहेरून आरोळी दिली, अहो कारभारणी पाणी द्या बर! ती पोळ्या करत होती  एका हातात  लाटण होते दुसर्‍या हाताने पाण्याच्या ग्लास भरून आणला. याने त्या शेठ सारखे करायच ठरवले म्हणजे माझी कारभारणी पण लाजेल, हसेल,मजा येईल, त्याने तोंडात थोडे पाणी घेतले आणि बायकोचा तोंडावर  फवारा मारला.ती दिवसभर काम करून अगोदरच थकलेली होती. तिला राग आला,हातात  लाटण होतेच त्या लाटण्याने तीने  नवर्‍याला धो धो धुतले
सांगायचे तात्पर्य एवढेच कि नक्कल करायला पण अक्कल लागते. कुणाचे अनुकरण करण्यापेक्षा आपण आपलं व्यक्तीमत्व असे  करावे लोकांनी आपलं अनुकरण केले पाहिजे.

कर्म हि पहचान होती है इंसान  की
जरूरी नही नेता,अभिनेता जैसी शक्ल होना।
एक बात ध्यान मे रखना
नकल के लिए  भी जरूरी है अपने पास अक्ल होना।

        शब्दांकन श्री.यशवंत निकवाडे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने