सिनेरामा प्रॉडक्शन इवेंट अँड मिडिया तर्फे गरजूंकरिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...!






दिवा-ठाणे
सध्याच्या वाढत्या लॉकडाऊन मुळे आणि हाताला काहीही काम नसल्याकारणाने कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यावर कमालीची बेकारी ओढवली आहे. अशा दैननीय परिस्थितीत सिनेरामा प्रॉडक्शन ने पुढाकार घेऊन दिवा, डोंबिवली व कल्याण परिसरातील जे उपेक्षित कलावंत आहेत आणि ज्यांची खरोखरच उपासमार होतेय असे गरजवंत पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कलाकार, घरकाम करणाऱ्या महिला यांना एक हात मदतीचा या तत्वावर
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमास ज्यांचा हातभार लागला असे सिनेरामा प्रॉडक्शनचे अभिनेते दिग्दर्शक राम माळी, समाजसेवक, कार्यकारी निर्माते गणेश तळेकर, प्रणव कदम, डॉ,निलेश चोपडा, उदय वैद्य, अभिनेते सुरेश वाडीले, अशोक शिंदे, पद्माकर भगत, माणिक भगत आदी सर्व दानशूर व्यक्तीनी मदतीचा एक हात पूढे करुन सिने नाट्य सृष्टीतील तंत्रज्ञ व कलावंत यांच्यावर जे उपासमारीचे संकट कोसळले आहे ते दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने