डॉ.विपुल बाफना व डॉ.सौ माधुरीताई बाफना यांनी आज माणुसकीचे घडवले दर्शन ....




डॉ.विपुल बाफना व डॉ.सौ.माधुरीताई बाफना यांच्या रुपात अक्षरशः देव पाहिला धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथील चंद्रशेखर सर्जेराव गायकवाड  यांच्यावर गेल्या १६ दिवसापासून उपचार चालू होता,त्यांच्या उपचारासाठी परिसरातील दातृत्ववान व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदत केली,तसेच या सर्व  परिस्थितीची माहिती डॉ.विपुल बाफना व डॉ.माधुरीताई बाफना यांना सांगितल्यावर त्यांनी डिस्चार्ज देतांना रुग्णाच्या बिलात तब्बल १ लाख रुपये सूट देण्याचे जाहीर केले,हे विधान ऐकल्यावर डॉ.बाफना यांनी माणुसकीचे दर्शन घडवून आणले,यावेळी बाजीराव पाटील,डॉ. प्रवीण साळुंखे.प्रदिप देसले सर,भूषण देसले,व डॉ.भैय्यासाहेब उपस्थित होते,या मदतीबद्दल  शेखर गायकवाड तसेच चिंचखेडे परिसरातील नागरिक संपूर्ण मित्रपरिवार यांनी डॉ.विपुल बाफना व डॉ.सौ.माधुरीताई बाफना यांचे आभार मानले.
तसेच संपूर्ण प्रक्रियेत डॉ.राजेश पाटील,डॉ.राहुल साळुंके. ज्ञानेश्वर मराठे,संदीप देसले,किशोर देसले सर, विजय मोरे सर,व परिसरातील दानशूर व्यक्तींचे आभार मानण्यात आले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने