मुकटीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी लाखो रुपयांचा ऐवज लंपास...





ग्रामीण भागात तीव्र उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी बाहेर वातानुकूलित हवेत झोपलेल्या नागरिकांच्या घरात संधी साधत एकाच रात्री तब्बल तीन धाडसी घरफोड्या केल्यात,घरातील रोकडसह दागिने चोरट्यांनी लांबविले असून या घटनेत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकही घटनास्थळी पोहचले असून उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सूरु होते.
मुकटीतील गोकुळ नामदेव पवार,बळीराम प्रभाकर पाटील व अंचाडेरोड वरील संजय बारकू मराठे यांच्या घरी चोरी झाली असून रात्री उकाडा खूप असल्याने हे लोक परिवारातील सदस्यांसह घराबाहेर झोपले होते,चोरट्यांनी ही संधी साधून चोरी केली, संजय मराठे यांच्या घरातील कपाटच चोरट्यांनी बाहेर  आणले होते,त्यामुळे चोरट्यांची हिंमत पाहता झोपलेले कोणी जागे होणार नाही,याची पूर्ण खबरदारी घेतल्याचे चोरट्यांच्या वर्तनावरून दिसून येत आहे,या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील,एपीआय,भूषण कोते, एएसआय,ए.टी. सोनवणे,हेकॉ,प्रवीण पाटील,पोकॉ,धीरज सांगळे, यांनी लागलीच मुकटीला धाव घेतली,शिवाय ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला माहिती देण्यात आल्याने ते देखील मुकटीला पोहचले होते,या ठिकाणाहून अंदाजे ७५ हजार रुपयांच्या रोकडसह दागिने चोरीस गेल्याचे सांगितले जात असून श्वानानेही घरापासून रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग काढला परंतु पुढे ते अपयशी ठरले आहेत,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने